PM Narendra Modi | लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांना केवडिया येथे अभिवादन केले.
गुजरातच्या केवडियामध्येही या दिनानिमित्त परेड आयोजित करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी ‘रायगडा’ची प्रतिकृती साकारण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसेच नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहनही केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. PM Narendra Modi |
रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेचे आणि शौर्याचे उदाहरण आहे. ते धैर्य आणि निर्भयतेचे प्रतिक आहे. यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात रायगडाला मानाचे स्थान दिले गेले याचा मला आनंद आहे. https://t.co/Sp2PBGH5xj pic.twitter.com/I9gIRHlkoZ
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर मराठीत पोस्ट करत म्हटले की, ‘रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेचे आणि शौर्याचे उदाहरण आहे. ते धैर्य आणि निर्भयतेचे प्रतिक आहे. यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात रायगडाला मानाचे स्थान दिले गेले याचा मला आनंद आहे.’
केंद्रीय गृहमंत्रालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. “रायगड किल्ला हा मराठा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे असामान्य शौर्य आणि अभिनव युद्धतंत्र दाखवण्यासाठी गुजरातच्या केवडियातील राष्ट्रीय एकता दिन परेडच्या ठिकाणी रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे”, असे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. PM Narendra Modi |
राष्ट्रीय एकदा दिवस का साजरा केला जातो?
सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे एकत्रीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आज आपल्याला एकसंघ भारत बघायला मिळतो. त्यांच्या प्रयत्नांचे स्मरण करण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.
या दिवशी देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चर्चासत्र आयोजित केली जातात. याशिवाय या दिनानिमित्त दरवर्षी भारत सरकारकडून एक थीम निश्चित केली जाते. यावर्षी रायगड किल्ल्याची थीम आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा:
श्रीनिवास वनगा अखेर ४ दिवसांनंतर घरी परतले; उमेदवारी नाकारल्याने होते नॉटरिचेबल