मुंबई – वसईच्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती मीरा रोड परिसरात घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची निघृण हत्या करण्यात आहे. आरोपीने शरीराचे तुकडे तुकडे करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 56 वर्षीय आरोपीवर नयानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत महिलेचे वय 32 वर्ष होते. ती मागील काही काळापासून मनोज नावाच्या 56 वर्षीय व्यक्तीसोबत मीरा रोड येथील गीता नगरच्या सातव्या मजल्यावर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. बुधवारी तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र घराला कुलूप असल्याने पोलिसांनी ते तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना तिथे महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले.
मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकत होता. इतकेच काय तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे तो उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करत होता. हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी कटर मशीनच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे केल्याची आरोपीनेकबुल केले आहे.
दरम्यान, हत्येसाठी वापरण्यात आलेले साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या महिलेचा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण हादरवणारे असून परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.