वारंवार ‘चौकीदार ही चोर है’ घोषणा दिल्याने राहुल गांधींवर खटला

बिहार -काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आज बिहारमधील समस्तीपूर येथील जाहीर सभेमध्ये उपस्थितांना वारंवार ‘चौकीदार ही चोर है’ ही घोषणा द्यायला भाग पाडल्याबाबत खटला दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुल गांधी यांची आज बिहारमधील समस्तीपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसच्या बिहारमधील मित्रपक्ष रालोआचे सर्वेसर्वा तेजस्वी यादव देखील मंचावर उपस्थित होते. राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करण्यासाठी मंचावर आले असता त्यांनी ‘चौकीदार…’ अशी घोषणा दिली. राहुल गांधींच्या या घोषणेला उपस्थितांमधून ‘चोर है’ असा प्रतिसाद मिळाला. यानंतर अशाच प्रकारे राहुल गांधींनी उपस्थितांना वारंवार ‘चौकीदार ही चोर है’ ही घोषणा देण्यास भाग पाडले.

सदर घटनेनंतर बिहारमधील एका वकिलाने राहुल गांधींनी वारंवार ‘चौकीदार ही चोर है’ अशी घोषणा दिल्याबाबत तथा उपस्थितांना तशी घोषणा देण्यास भाग पाडल्याबद्दल येथील आरा दिवाणी न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे. राहुल यांच्याबरोबरच रालोआचे नेते तेजस्वी यादव यांचेही नाव खटल्यामध्ये आहे.

काय आहे ‘चौकीदार ही चोर है’ प्रकरण? – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणामध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशातील भ्रष्टाचाराविरोधात चौकीदाराप्रमाणे काम करत असल्याचे म्हंटले होते. पंतप्रधानांच्या याच वक्तव्याचा आधार घेत राहुल गांधी यांनी ‘चौकीदार ही चोर है’ अशी घोषणा दिली होती. राहुल गांधींच्या ‘चौकीदार ही चोर है’ टीकेला प्रतिउत्तर देताना केंद्रातील जेष्ठ भाजप नेत्यांनी ट्विटर खात्यावरील आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ लावत ‘चौकीदार इमानदार है’ असा संदेश दिला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.