निवडणूक आयोगातर्फे साध्वी प्रज्ञा सिंह यांना पुन्हा नोटीस

भोपाळ –  साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी बाबरी मस्जिद पाडल्याचा आपल्याला अभिमान आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. साध्वी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी निवडणूक आयोगातर्फे त्यांच्यावर ३ दिवसांसाठी प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी निवडणुकीच्या प्रचारात सहभाग नोंदवल्याने आज पुन्हा साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना निवडणूक आयोगातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक आयोगातर्फे ३ दिवसांसाठी प्रचारबंदी असतानादेखील प्रचारात उतरल्याने निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना नोटीस बजावत उत्तर देण्यास सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.