हनुमाकडून सचिनच्या पराक्रमाची पुनरावृत्ती

किंगस्टन: दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या हनुमा विहारीने दुसऱ्या डावातही अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकासह हनुमा विहारीने तब्बल 29 वर्षांनी विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली.

दुसऱ्या कसोटी सामन्यातील नाबाद अर्धशतकासह त्याने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या या पराक्रमी कामगिरीमुळे त्याचे नाव तेंडुलकरसह अन्य दिग्गजांच्या यादीत समावेश झाले आहे. आशियाच्या बाहेर सहाव्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर शतक आणि अर्धशतकीय खेळी करण्याचा पराक्रम करणारा विहारी भारताचा पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, मंसूर अली खान पतौडी, एमएल जयसिम्हा आणि पॉली उमरीगर या दिग्गजांनी असा पराक्रम केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

असा पराक्रम करणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी
पॉली उमरीगर 56 आणि 172 नाबाद वि. वेस्टइंडीज, पोर्ट ऑफ स्पेन (1962)
मंसूर अली खान पतौडी 64 आणि 148 वि. इंग्लंड, लीड्‌स (1967)
एमएल जयसिम्हा 74 आणि 101 वि. ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन (1968)
सचिन तेंडुलकर 68 आणि 119 नाबाद वि. इंग्लंड, मॅनचेस्टर (1990)
हनुमा विहारी 11 आणि 53 नाबाद वि. वेस्टइंडीज, जमैका (2019)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)