इस्लामाबादः पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी कलम 370 बद्दल वक्तव्य केले आहे. बाजवाम्हणाले की, बालाकोट हवाई हल्ला आणि भारतीय घटनेतील कलम 370 रद्द केल्यामुळे, जम्मू-काश्मीरमध्ये विभाजन करण्याच्या दोन घडामोडींसह दक्षिण आशियातील भौगोलिक राजनैतिक परिस्थितीवर दीर्घकाळ परिणाम होणार आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या रिसर्च जर्नल ‘ग्रीन बुक 2020’ मधील एका लेखात बाजवा यांनी काश्मीरचे विभक्त युद्धाला आमंत्रण देणारे ‘अणु फ्लॅश पॉईंट’ असे वर्णन केले आहे. या मासिकाला पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने मान्यता आहे.ग्रीन बुक हे पाकिस्तानी लष्कराचे द्वैवार्षिक मासिक आहे, ज्यात सेवारत आणि सेवानिवृत्त अधिकारी असे लेख लिहतात.या लेखातून सैन्याची संपूर्ण रणनीती आणि उद्दीष्टे काय आहेत याचा लेखाजोखा असतो.
पाकिस्तानच्या नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी (एनडीयू) च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या ग्रीन बुकच्या ताज्या आवृत्तीत लष्करी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकारांनी लिहिलेल्या बहुतेक लेखांमध्ये काश्मीरच्या मुद्दयाचा उल्लेख आहे. तसेच या लेखांमध्ये काश्मीरमधील लोकांना पाठिंबा दर्शविला आहे. काश्मिरात सवांद स्थापित करणे, माहितीचा अवलंब करणे आणि सायबर युद्धासारख्या विषयावर लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.या मासिकाच्या पहिल्याच पानावर बावजा यांनी आपले विचार मांडले आहेत.
बावजा यांनी २०१९ मधील दोन घटनांमुळे भौगोलिक परिस्थितीवर दीर्घकालीन परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, भारतीय वायुसेनेने 2 फेब्रुवारी रोजी बालाकोटवर हल्ला केला होता. तर ऑगस्टमध्ये भारतीय राज्यघटनेतील कलम 370 आणि A 35 ए रद्द करण्यात आले होते. जगभरात निंदा झाल्यानांतर देखील कलम 370 आणि A 35 ए रद्द केल्यानंतर आठ लाखाहून अधिक मुस्लिमांचे जीवन व्यथित झाले आहे. पुढे त्यांनी लिहले आहे कि, ‘काश्मीर अणुयुद्धांना आमंत्रण देण्याचे केंद्रबिंदू आहे.
आंतरराष्ट्रीय नियमांकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्या जवळच्या शेजारच्या राष्ट्रांना धोक्यात आणले आहे. तर त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण जगाला त्यांनी संकटात टाकले आहे. दरम्यान, कलम 370 रद्द केल्यानंतर भारताला आंतराष्ट्रीय संघटनांचा विरोध सहन करावा लागला होता. त्यावर भारताने कलम 370 हा देशाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले होते.