मुंबई – मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी तक्रारदार महिला रेणू शर्मा यांच्याकडून मला ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप केला होता. मुंडे यांच्या आरोपांचे रेणू शर्मा ( Renu Sharma ) यांचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी खंडन केले आहे.
रमेश त्रिपाठी यांनी याबदल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, . “रेणू शर्मा यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्या अजूनही पेईंग गेस्ट रुममध्ये राहतात. मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले ब्लॅकमेलिंगचे आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत.”
पुढे ते म्हणतात, आमच्याकडे एवढे पुरावे आहेत, तसेच काही व्हिडीओ क्लीप देखील आहेत. ते समोर येताच लोकांची तोडं बंद होतील. पण सध्या याप्रकरणी चौकशी प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे ते पुरावे उघड केले जाऊ शकत नाही. अशी प्रतिक्रिया रेणू शर्मा यांचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.