शमसुर रहमान फारूकी यांचे निधन

अलाहाबाद – प्रख्यात उर्दू कवी आणि समिक्षक शमसुर रहमान फारूकी यांचे शुक्रवारी निधन झाले. गेल्या महिन्यात ते करोनामुक्‍त झाले होते. ते 85 वर्षांचे होते. “मला अलाहाबाद मधील घरात घेऊन जा, असा आग्रह ते करत होते.

त्यानुसार आज सकाळी त्यांना घरी आणले. त्यानंतर अर्ध्या तासातच त्यांची प्राणज्योत मालवली, असे त्यांचे पुतणे आणि लेखक महंमद फारूकी यांनी सांगितले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेल्या फारूकी यांना करोनातून बरे झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला घरी सोडण्यात आले होते. मात्र स्टेरॉईडमुळे त्यांची प्रकृती खालावली.

दस्तंगोई या उर्दु कथाकथन शैलीचे पुनरूज्जिवन करण्याचे श्रेय फारूकी यांच्याकडे जाते. कई चांद दी सारे आस्मान या त्यांच्या पुस्तकाचा मिरर ऑफ ब्युटी हा अनुवाद करण्यात आला होता. घालीब अफसाने की हिमायत में, द सन दॅट रोज फ्रॉम द अर्थ ही त्यांची पुस्तके गाजली होती.

अठराव्या शतकातील कवी मिर ताकी मिर यांच्या काव्यावर चार खंडांचे लिहलेल्या ग्रंथाबद्दल त्यांना सरस्वती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लेखक विल्यम डलरीमपल, संजीव सराफ यांनी फारूकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.