मुंबई – युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज (यूएचसी) संपादित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे आता ‘लॅन्सेट सिटिझनस कमिशन – भारतीय आरोग्य यंत्रणेची पुनर्रचना’च्या सादरीकरणासह नागरिक आणि भारतीय आरोग्य यंत्रणेच्या विविध विभागांमधील प्रख्यात भागधारकांच्या पुढाकारासह विश्लेषण करण्यात येणार आहे. कमिशनचे कार्यसंचालन आणि कमिशनचा पुढील दोन वर्षांमध्ये त्यांच्या निष्पत्ती व शिफारसींचा अंतिम अहवाल प्रकाशित करण्याचा मनसुबा आहे.
जगातील आघाडीचे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिक ‘दि लॅन्सेट’ आणि दि लक्ष्मी मित्तल ऍण्ड फॅमिली साऊथ एशिया इन्स्टिट्यूट, हार्वर्ड युनिव्हर्सिटीसोबत सहयोगाने निर्माण करण्यात आलेल्या कमिशनचा प्रत्येक भारतीयाला दर्जात्मक व किफायतशीर हेल्थकेअर सेवा सर्वत्र उपलब्ध करून देण्याच्या खात्रीसाठी आराखडा तयार करण्याचा प्रमुख दृष्टिकोन असेल. चार प्रख्यात आरोग्य व व्यवसाय प्रमुख (प्रसिद्धी पत्रकामध्ये उल्लेख केलेले सह-अध्यक्ष) कमिशनचे नेतृत्व करतील. या प्रमुखांनी शैक्षणिक, वैज्ञानिक समुदाय, नागरी समाज आणि सार्वजनिक हेल्थकेअरमधील तीस तज्ञांना कमिशनवर सेवा देण्यासाठी एकत्र आणले आहे.
कमिशनच्या दृष्टिकोनाबाबत सांगताना बायकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मझुमदार-शॉ म्हणाल्या, ”हा अद्वितीय सल्लागारिता व सहभागात्मक उपक्रम आहे, ज्याचा सार्वत्रिक आरोग्य समानतेच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक समानतेला चालना देण्याचा मनसुबा आहे. हा उपक्रम देशभरातील नागरिकांना समाविष्ट करून त्यांना भारतीय आरोग्य यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांमध्ये अग्रस्थानी ठेवण्याचा आणि या देशामध्ये सार्वत्रिक हेल्थकेअरला वास्तविक रूप देण्याचा प्रयत्न करतो.
दि लॅन्सेटच्या वरिष्ठ कार्यकारी संपादक पामेला दास म्हणाल्या, वर्ष 2020 मध्ये प्रथम प्रकाशित करण्यात आलेल्या लॅन्सेट इंडिया सिरीजने यूएचसीसाठी प्रबळ आराखड्याला समोर आणले. हे नवीन कमिशन त्या दृष्टिकोनाला नवीन रूप देण्याची आणि नवीन सुधारणा करण्याची, तसेच भारतातील धोरणामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रक्रियेमध्ये भारतीय नागरिकांना प्राधान्य देण्याची संधी आहे. आम्ही आमच्या भारतीय सहका-यांसोबत या महत्त्वाच्या प्रयत्नावर काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहोत.