Renaming: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2 जानेवारी रोजी दिल्लीत ‘जम्मू-काश्मीर अँड लडाख थ्रू द एज’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात सांगितले की, काश्मीर ही कश्यपांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यांच्या नावावरून काश्मीर हे नाव पडले असावे. शहा इतिहास दुरुस्त करण्याबद्दलही बोलले. ते म्हणाले, राज्यकर्त्यांना खूश करण्यासाठी लिहिलेल्या इतिहासापासून मुक्त होण्याची वेळ आली आहे. मी इतिहासकारांना तथ्यांसह इतिहास लिहिण्याचे आवाहन करतो. अमित शहांच्या या विधानांमुळे भाजप सरकार काश्मीरचे नाव बदलू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.
नरेंद्र मोदी सरकार 2014 साली सत्तेत आल्यापासून त्यांनी देशातील अनेक शहरांचे नामांतर केले आहे. त्यामध्ये देशातील प्रमुख शहर-जिल्हेच नव्हे तर अनेक सरकारी योजनांशिवाय विविध शहरे-राज्यांमधील स्थानिक रस्ते आणि ठिकाणांचे नाव प्रशासनाकडून बदलण्यात आले आहे. खरेतर, विविध ठिकाणे आणि योजना यांचं नाव बदलण्याचे सत्र भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच सुरू झाले होते. पण मोदी सरकारच्या काळात नामांतराच्या प्रक्रियेला मोठा वेग मिळाल्याचं दिसून येते. त्यामुळे, नाव बदलण्याबाबतच्या मोदी सरकारच्या या धोरणावर विरोधी पक्ष आणि तज्ज्ञांकडून वेळोवेळी टीका करण्यात आली आहे.
2014 मध्ये तर कर्नाटकच्या 12 शहरांच्या नावात बदल करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने एकाच वेळी मंजुरी दिली होती. हा निर्णय कर्नाटकच्या भाजप आणि जनता दल पक्षाच्या युती सरकारने 2007 सालीच घेतला होता. मात्र, केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) सरकारकडून त्यासाठीचा प्रस्ताव थंड बस्त्यात ठेवण्यात आला होता. अखेर, मे 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या निर्णयाला तत्काळ मंजुरी मिळाली. 1 नोव्हेंबर 2014 पासून या 12 शहरांच्या नव्या नावाचा वापर सुरू करण्यात आला. इथूनच मोदी सरकारच्या कार्यकाळाती नामांतराचे सत्र सुरू झाले. यानंतर पुढील काळात अनेक शहर-जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. त्याशिवाय, या कालावधीत रेल्वे स्थानके, इतर ठिकाणे आणि स्थानिक रस्त्यांची नावे बदलल्याची यादीही मोठी आहे.
नाव बदलण्याची प्रक्रिया काय आहे?
कोणत्याही शहर-जिल्ह्याच्या ठिकाणाचे नाव बदलण्याचा अधिकार हा संबंधित राज्य सरकारकडे असतो. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाकडून हा निर्णय मंजूर करून घ्यावा लागतो. साधारपणपणे संबंधित ठिकाणाहून होणाऱ्या मागणीनंतर त्या प्रस्तावावर विचार केला जातो. त्यासाठी एखादे आमदार सरकारसमोर हा विषय मांडतात. कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब होते. यानंतर पुढे हा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला जातो. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय यासंदर्भात इतर संबंधित मंत्रालय आणि संबंधित विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेते. यामध्ये रेल्वे, पोस्ट विभाग, परिवहन मंत्रालय इत्यादींचा समावेश असतो. या सर्व विभागांकडून NOC मिळाल्यानंतर गृह मंत्रालय नामांतरासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देते.
मोदी सरकारने बदललेली प्रमुख शहर-जिल्ह्यांची नावे –
पूर्वीचे नाव – बदललेले नाव –
बंगलोर – बंगळुरू (कर्नाटक), मंगलोर – मंगळुरू (कर्नाटक), म्हैसूर – म्हैसुरू (कर्नाटक), गुलबर्गा – कलबुर्गी (कर्नाटक), हुबळी – हुब्बळी (कर्नाटक), शिमोगा – शिवमोगा (कर्नाटक), चिकमंगळूर – चिक्कमंगळुरू (कर्नाटक), बेल्लारी – बळ्ळारी (कर्नाटक), बिजापूर – विजयपुरा (कर्नाटक), हॉस्पेट – होसपेटे (कर्नाटक), तुमकूर – तुमकुरू (कर्नाटक), राजमुंद्री – राजमहेंद्रवरम (आंध्र प्रदेश), गुडगाव – गुरुग्राम (हरयाणा), अलाहाबाद – प्रयागराज (उत्तर प्रदेश), न्यू रायपूर – अटल नगर (छत्तीसगढ), होशंगाबाद – नर्मदापुरम (मध्य प्रदेश),
औरंगाबाद – छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र), उस्मानाबाद – धाराशिव (महाराष्ट्र), अहमदनगर -अहिल्यानगर.
या रेल्वे स्थानकांना मिळाले नवीन नाव –
पूर्वीचे नाव – बदललेले नाव –
छत्रपती शिवाजी टर्मिनस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (महाराष्ट्र), बंगळुरू सेंट्रल – स्वातंत्र्यसैनिक संगोल्ली रायण्णा स्टेशन (कर्नाटक), झांसी – वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन (मध्य प्रदेश), मुघलसराय – दीन दयाळ उपाध्याय स्टेशन (उत्तर प्रदेश), हबीबगंज – राणी कमलापती रेल्वे स्टेशन (मध्य प्रदेश), फैजाबाद जंक्शन – अयोध्या कँटोनमेंट जंक्शन (उत्तर प्रदेश), हुब्बळी रेल्वे स्टेशन – सिद्धारूढ स्वामीजी रेल्वे स्टेशन (कर्नाटक), ओशिवरा – राम मंदिर (महाराष्ट्र), एलफिन्स्टन रोड – प्रभादेवी (महाराष्ट्र), मंडुआडीह – बनारस (उत्तर प्रदेश), दांदुपूर – माँ वराही देवी धाम रेल्वे स्टेशन (उत्तर प्रदेश), रॉबर्ट्सगंज – सोनभद्र (उत्तर प्रदेश), पातालपानी – टंट्या भिल मामा रेल्वे स्टेशन (मध्य प्रदेश), मियाँ का बाडा – महेश नगर हाल्ट (राजस्थान), केवडिया – एकता नगर (गुजरात), पांकी – पांकी धाम (उत्तर प्रदेश), या व्यतिरिक्त, गुजरातमधील कांडला पोर्ट या बंदराचे नाव बदलून दीनदयाल पोर्ट असे नवीन नाव त्या बंदराला देण्यात आले आहे.
राजधानी दिल्लीतील बदललेल्या ठिकाणांची नावे –
पूर्वीचे नाव – बदललेलं नाव
मुघल गार्डन्स – अमृत उद्यान, रेसकोर्स रोड – लोककल्याण मार्ग, राजपथ – कर्तव्य पथ, औरंगजेब रोड – एपीजे अब्दुल कलाम रोड, तीन मूर्ती चौक – तीन मूर्ती-हायफा चौक, डलहौसी रोड – दाराशिकोह रोड.
नामांतरासाठी इतर मागण्या –
देशभरातील ठिकाणांची नावे बदलली जात असताना शहर-जिल्हेच नव्हे तर राज्यांची नावे बदलण्यासाठीही मागण्या स्थानिक पातळीवरून होत आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगाल (West Bengal) चे नाव बदलून बांग्ला, तर केरळचं नाव बदलून केरलम असे करण्याची प्रमुख मागणी आहे. त्याशिवाय इतर काही शहर-जिल्ह्यांची नावे बदलण्याच्या मागण्या अधूनमधून होत असतात. त्यामध्ये मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचे नामांतर भोजपाल, तेलंगणाची राजधानी हैदराबादचे नामांतर भाग्यनगर, गुजरातची राजधानी अहमदाबादचे नामांतर कर्णावती, बिहारची राजधानी पटनाचे नाव बदलून पाटलीपुत्र, हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलाचे नाव बदलून श्यामला, उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरचे नाव बदलून लक्ष्मी नगर असे करण्याची मागणी किंवा प्रस्ताव आहेत.
मुख्य नाव बदल: ओरिसा 2011 मध्ये ओडिशा, 1995 मध्ये बॉम्बे बदलून मुंबई, 1996 मध्ये मद्रास चेन्नई आणि 2001 मध्ये कलकत्ता बदलून कोलकाता करण्यात आले. केंद्राने 2014 मध्ये कर्नाटकातील 11 शहरांची नावे बदलण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर बंगलोर बदलून बेंगळुरू करण्यात आले.
नामांतर केल्यास खर्च किती येतो ?
सरकारी कागदपत्रात लिहिलेल्या नावाने त्या शहरातील रहिवाशांना फारसा फरक पडत नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण या नाव बदलाचा खर्च त्यांच्या खिशातून नक्कीच जातो. हा खर्चही कमी नाही. शहराचे नाव बदलण्यासाठी सरासरी 300 कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो, जर शहर मोठे असेल तर ही रक्कम 1000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. एखाद्या रस्त्याचे किंवा परिसराचे नाव बदलायचे असेल तर त्यासाठी फारसा खर्च येणार नाही. स्वातंत्र्यानंतर बहुतेक नाव बदल ब्रिटिशांच्या चुकांमुळे झाले. त्रिवेंद्रम ते तिरुअनंतपुरम किंवा कोचीन ते कोची हे ब्रिटीशांचे स्पेलिंग सुधारण्यासाठीच केले गेले. स्वातंत्र्यानंतर 21 राज्यांनी एकूण 244 ठिकाणांची (आकडेवारी 2023 पर्यंत) नावे बदलली आहेत.
शहरांची नावे बदलण्याबाबत बहुतांश वाद उत्तर प्रदेशात होत असले तरी, ठिकाणांची नावे बदलण्यात यूपी आघाडीवर नाही. 2023 च्या आकडेवारीनुसार आंध्र प्रदेशात सर्वाधिक 76 ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. तामिळनाडूने 31 तर केरळने 26 ठिकाणांची नावे बदलली आहेत. महाराष्ट्रानेही 18 ठिकाणांची नावे बदलली आहेत. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात फक्त 8 शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील 9 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांची नावेही बदलण्यात आली आहेत.
स्वातंत्र्यानंतर या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे बदलली –
– पूर्व पंजाब झाला पंजाब : हा बदल 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाला. नंतर 1966 मध्ये पंजाबचे तीन राज्यांमध्ये विभाजन करण्यात आले: हरियाणा, हिमाचल आणि पंजाब.
– संयुक्त प्रांत बनला उत्तर प्रदेश : हा बदल 24 जानेवारी 1950 रोजी लागू झाला. 2000 मध्ये उत्तर प्रदेशचे विभाजन करून उत्तरांचल राज्य निर्माण झाले.
– उत्तरांचल बनले उत्तराखंड: 2000 मध्ये स्थापन झालेल्या राज्याचे नाव बदलून 2007 मध्ये उत्तराखंड करण्यात आले.
-आंध्र राज्य एक नवीन राज्य बनले: 1 ऑक्टोबर 1953 रोजी मद्रास प्रेसिडेन्सीच्या तेलगू भाषिक भागाला आंध्र राज्याचा दर्जा मिळाला. यामध्ये हैदराबाद राज्याचाही सहभाग होता. 1 नोव्हेंबर 1956 रोजी आंध्र राज्याचे आंध्र प्रदेश असे नामकरण करण्यात आले.
– त्रावणकोर-कोचीन झाले केरळ: हा बदल 1 नोव्हेंबर 1956 रोजी लागू झाला.
-मध्य भारताचा मध्य प्रदेश बनला: हा बदल 1 नोव्हेंबर 1959 रोजी लागू झाला.
– मद्रास राज्य तामिळनाडू बनले: हा बदल 14 जानेवारी 1969 रोजी अंमलात आला.
-म्हैसूर राज्य कर्नाटक बनले: हा बदल 1 नोव्हेंबर 1973 रोजी लागू झाला.
– ओरिसा झाला ओडिशा: हा बदल नोव्हेंबर 2011 पासून लागू झाला.
-Laccadive, Minicoy आणि Amandivi बनले लक्षद्वीप : हा बदल 1 नोव्हेंबर 1973 रोजी अंमलात आला.
-पाँडिचेरी बनले पुडुचेरी: नावातील हा बदल 1 ऑक्टोबर 2006 पासून लागू झाला.
देशातील 6.77 लाख गावांमध्ये 6 हजारांहून अधिक गावे राम-कृष्णाच्या नावावर आहेत…234 अकबराच्या नावावर
– 2011 च्या जनगणनेनुसार देशातील एकूण गावांची संख्या 6,77,459 आहे.
-यापैकी 3626 गावांची नावे भगवान रामाच्या नावावर आहेत.
– 3,309 गावांची नावे भगवान कृष्णाच्या नावाशी जोडलेली आहेत.
– 234 गावांची नावे मुघल सम्राट अकबराच्या नावावर आहेत.
– बाबरच्या नावावर 62, हुमायूनच्या नावावर 30 आणि शाहजहानच्या नावावर 51 गावे आहेत.
– औरंगजेबाच्या नावावर 8 गावे आहेत आणि ती सर्व यूपीच्या बिजनौरमध्ये आहेत.
भारतातील ‘या’ टॉप 10 शहरांची नावे का बदलली?
अलाहाबाद ते प्रयागराज (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने अलाहाबाद हे नाव बदलून आता प्रयागराज केले. मुघल सम्राट अकबराने या शहराचे नाव इलाहाबाद ठेवले होते. त्यांचा नातवाने त्याचे नाव नंतर अलाहाबाद केले. त्यामुळे आज त्यांचे नाव बदलण्यात आले.
गुडगाव ते गुरुग्राम (हरयाणा)
मनोहर लाल खट्टर सरकारने गुडगावचे नाव बदलून गुरुग्राम असे करण्यात आले. महाभारतात गुरुग्रामचे वर्णन गुरू द्रोणाचार्यांचे गाव, कौरव आणि पांडवांचे गुरु म्हणून केले जाते. म्हणूनच आज ते गुरुग्राम म्हणून ओळखले जाऊ लागले.
बॉम्बे ते मुंबई (महाराष्ट्र)
आपली मुंबई ही पूर्वी बॉम्बे होती. मुंबादेवीच्या नावावर या शहराचे नाव मुंबई करण्यात आले. 17 व्या शतकात इंग्रजांनी शहराचा ताबा मिळवल्यानंतर पोर्तुगीजांचे नवा बॉम्बे असे ठेवले होते. 1995 मध्ये ते मुंबई करण्यात आले.
कलकत्ता ते कोलकाता (बंगाल)
राज्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंचा विचार करुन कलकत्ता आज कोलकाता झाला. हे शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. सिटी ऑफ जॉय असं टोपणनावने देखील ओळखलं जातं.
म्हैसूर – म्हैसुरू (कर्नाटक)
सुमारे सहा शतके म्हैसूर नावाने ओळखले जाणारे हे शहर म्हैसुरु म्हणून नावारुपाला आले. कन्नड भाषेत महिषाचे निवासस्थान आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, म्हैसूर हे ठिकाण आहे. जिथे देवी चामुंडेश्वरीने त्याचा वध करण्यापूर्वी राक्षस राजाने राज्य केले होते.
मंगलोर ते मंगळुरू (कर्नाटक)
मंगलादेवी मंदिराची प्रमुख देवता मंगलादेवी यांच्या नावावरुन या शहराचे नाव देण्यात आले. हे शहर कन्नडमध्ये मंगळुरु म्हणून ओळखले जाऊ लागले. मंगळुरुच्या विविध समुदायांनी त्यांच्या भाषांमध्ये या शहराला वेगवेगळी नावे दिली होती.
बंगलोर ते बंगळुरू (कर्नाटक)
भारताची आयटी राजधानी आजचे बंगळुरु काही वर्षांपूर्वी बंगलोर नावाने ओळखले जायचे. 2006 मध्ये त्यांचे नाव बंगळुरु झाले. बेंगळुरु कन्नड भाषेतील नाव आहे. नवव्या शतकातील पश्चिम गंगा राजवंशाच्या शिलालेखात बेंगळुरुचा असा उल्लेख आहे.
मद्रास ते चेन्नई (कर्नाटक)
मद्रास हे नाव 1996 मध्ये चेन्नई असे नाव झाले. हे ब्रिटीशकालीन नाव असल्याने बदलण्यात आले. ब्रिटीश लष्करी नकाशाकारांचा असा विश्वास होता की मद्रास हा मूळचा मुंडिर राज किंवा मुंडीराज होता. म्हणून त्यांनी हे नावे ठेवले होते.
पाँडेचेरी ते पुद्दुचेरी (तामिळनाडू)
केंद्राने 2006 मध्ये पाँडेचेरीचं नामातंरण केले. आता त्याला पुडुचेरी या नावाने ओळखले जाते. तमिळमध्ये पुडुचेरी याचा अर्थ नवीन शहर असा होतो.
ओरिसा ते ओडिशा (बंगाल)
ब्रिटीशकालीन नाव मोदी सरकारने बदलली. ओडिशा हा मूळ आणि प्राचीन नाव आहे. ग्रंथामध्ये पण ओरिसा नाही ओडिशा असा उल्लेख करण्यात आला आहे. पुरीमधील मंदिरांच्या भिंतींवर गजपती राज्याच्या कपिलेंद्र देवाचे शिलालेख या प्रदेशाला ओडिशा असे म्हटले गेले आहे.