मुंबई – शहरांच्या नामांतरांचे राजकारण अनेक वर्षांपासून होत आहे राजकीय नेते शहरांची नाव बदलण्याची मागणी अनेकदा करत असतात. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे, “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार”. या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार.@mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/9mt46cpYWD
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 13, 2023
दरम्यान, या आधीही संभाजी ब्रिगेडने पुण्याचे नाव पुण्याचे ‘जिजाऊनगर’ अथवा ’जिजापूर’ करावे अशी मागणी केली होती. आता अमोल मिटकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने नामांतरांचे राजकारण पुन्हा पेटणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.