शक्‍य असल्यास मला हटवून दाखवा; पंतप्रधान ओली यांचे विरोधकांना आव्हान

काठमांडू – शक्‍य असल्यास आपल्याला पंतप्रधान पदावरून हटवून दाखवावे, असे उघड आव्हान नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळमधील फुटिर गटाचे नेते आणि माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांना दिले आहे. प्रचंड यांच्या गटाने संसदेमध्ये अविश्‍वास ठराव आणावा असे आव्हान त्यांनी प्रचंड यांच्या गटाला दिले.

“मी अजूनही नेपाळमधील सत्तारुढ पक्षाचा नेता आहे. मी पक्षाचा अध्यक्ष आणि पंतप्रधानही आहे. जर तुम्ही संसद पुनरुज्जीवित केली असेल तर केपी ओली यांना पंतप्रधानपदावरून काढून दाखवा.’ असे ओली म्हणाले.

ओली यांनी केलेल्या शिफारसीनुसार अध्यक्षा बिद्या देवी भांडारी यांनी 20 डिसेंबरला संसदेचे प्रतिनिधीगृह विसर्जित करून 30 एप्रिल रोजी नव्याने निवडणूका घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान ओली आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे सहअध्यक्ष प्रचंड यांच्यात सत्तास्पर्धा सुरू झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात नेपाळमधील सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापिठाने ओली यांचा प्रतिनिधीगृह विसर्जित करण्याचा महत्वाचा निर्णय दिला आणि 9 मार्चपूर्वी संसदेचे अधिवेशन बोलावून सरकारने बहुमत सिद्ध करण्याचेही निर्देश दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.