नवी दिल्ली – केंद्र सरकारने करोना लसीसाठी वयाची अट काढून टाकून सर्वांनाच मोफत करोना लस द्यावी अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांकडे पत्र पाठवून केली आहे. केंद्राने लसीसाठीची वयाची अट काढून टाकली तर दिल्ली सरकार केवळ तीन महिन्यात दिल्लीतील सर्व नागरीकांना करोनाची लस देईल आणि त्यातून करोना आटोक्यात येण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
करोनाच्या नियंत्रणाच्या संबंधात केंद्र सरकारने आम्हाला चांगले सहकार्य केले आहे आता त्यांनी करोना लसीसाठी वयाची अट काढून टाकल्यास आम्हाला अत्यंत वेगाने लसीकरण करता येईल असे ते म्हणाले. दिल्लीत पुन्हा करोना रूग्ण वाढू लागले आहेत. आज दिवसभरात दिल्लीत एकूण 4 हजार 33 नवीन करोना रूग्ण आढळून आले असून करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 11 हजार 81 इतकी झाली आहे.