कलम ३७० काढून घेतल्यास राज्यात बळजबरीची सत्ता होईल – मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीर राज्याला प्रदान करण्यात आलेल्या विशेष राज्याच्या दर्जाचे जोरदार समर्थन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज पुन्हा केले आहे. जम्मू-काश्‍मीर राज्याला असलेले कलम ३७० काढून घेतल्यास राज्यात बळजबरीची सत्ता होईल असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हंटले आहे. पुढे बोलताना मेहबुबा मुफ्ती यांनी ज्याप्रमाणे पॅलेस्टाईन वर इजरायलचा कब्जा आहे त्याप्रमाणेच जम्मू-काश्‍मीर मध्ये विशेष राज्याचा दर्जा काढल्यास, भारताचा कब्जा होईल असे त्या म्हणाल्या.

जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याबाबत अनुकूलता दर्शवणारी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी नुकतीच मांडली होती. त्यावरून मेहबुबा यांनी जेटली यांच्यावर पलटवार केला होता. जम्मू-काश्‍मीरला राज्यघटनेच्या ३७० व्या कलमांतर्गत विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. ते कलम म्हणजे भारत आणि जम्मू-काश्‍मीरमधील पूल आहे. ते कलम रद्द करण्यात आल्यास भारताबरोबर राहण्याचा फेरविचार राज्याला करावा लागेल, तसेच हा दर्जा काढून घेतल्यास जम्मू-काश्‍मीरचे भारताबरोबरचे संबंध संपुष्टात येतील, असे त्यांनी यापूर्वी म्हटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.