मुंबई – बॉलिवूडला आणखी एक मोठा झटका बसला आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर ‘सरोज खान’ यांचं ३ जुलैला पहाटे निधन झालं . त्या 71 वर्षांच्या होत्या. सरोज खान यांचा समावेश बॉलीवूडच्या दिग्गज नृत्यदिग्दर्शकांमध्ये होतो. त्यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना नृत्याचे धडे दिले होते. कलाक्षेत्रातील योगदानासाठी सरोज खान यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.
दरम्यान, बॉलीवूडमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सरोज खान यांची इच्छा होती की,’कोरिओग्राफ आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाने त्यांचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आणावा’ यासाठी तो सुद्धा लवकरच सरोज यांची मुलगी सुकैनाशी संपर्क साधणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.