मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दिशाची चांगलीच लोकप्रिय आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.
सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळेच दिशाच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणात लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात. नुकतंच, दिशाचा एक नवीन व्हिडिओ फॅन्सच्या भेटीला आहे. शाहरुख खान आणि काजोलच्या ‘बाजीगर’ या आयकॉनिक चित्रपटातील ‘ये काली काली आँखे’ या गाण्याचा हा व्हिडिओ असून, लवकरच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
ऑल टाईम फेव्हरेट असलेले हे गाणे आजही लोकांना आवडते. हे गाणे पुन्हा रिक्रिएट करण्यात आले असून, या व्हिडिओत दिशाचा बोल्ड अंदाज दिसून आला आहे. फॅन्स सुद्धा दिशा पाटणीच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या गाण्याची झलक शेअर केली आहे.