प्रकाश आंबेडकरांकडून रोहित वेमुलाच्या स्मृतीस अभिवादन!

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत रोहित वेमुलाच्या स्मृतीस अभिवादन केले. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीचे पीएचडी विद्यार्थी रोहित वेमुला यांनी गळफास लावून १७ जानेवारी २०१६ विद्यापीठ कॅम्पसमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर राजकीय वाद निर्माण झाले.

रोहित व इतर चार सहकाऱ्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले होते. तसेच विद्यापीठात त्यांना इतर सुविधा नाकारल्या गेल्या. या घटनेनंतर रोहितला खूप वाईट वाटू लागले. त्यांच्या निलंबन केल्यामुळे पाच विद्यार्थ्यांनी उपोषणही सुरू केले होते. परंतु विद्यापीठाने कोणताही निर्णय घेतला नाही. तीन दिवसाच्या उपोषणानंतर रोहित वेमुलाने आपल्या विद्यार्थी संघटनेच्या ध्वजाच्या सहाय्याने आत्महत्या केली.

Leave A Reply

Your email address will not be published.