गडकिल्ल्यांना हात लावाल तर याद राखा; धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा 

मुंबई –  राज्यातील 25 गड आणि किल्ल्यावर राज्यशासनाने हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर गडप्रेमींकडून टीका होत आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भाड्यावर देण्याचा निर्णय हे भांडवलशाही सरकार घेत आहे. हा शिवबांचा, आम्हा मावळ्यांचा अपमान आहे. धनदांडग्या उद्योगपतींसाठी सरकार इतिहास नामशेष करायला निघाले आहे. याद राखा गडकिल्ल्यांना हात लावाल तर, असा इशाराही धनंजय मुंडेंनी सरकारला दिला.

#व्हिडीओ : सरकारच डोक ठिकाणावर आहे का – डॉ . कोल्हे

दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही संताप व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.