याद राखा अफवा पसरवाल तर…! पुण्यात लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होणार

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोना आणि लॉकडाऊनबाबत अफवा देखील पसरत आहेत. अशातच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र पुण्यात लॉकडाऊन करण्याबाबत कुठलेही आदेश नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

पुण्यात काही जुन्या माहितीचे व्हिडीओ, फोटो वापरत ठराविक भागांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. नुकतंच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथेही लॉकडाऊन लागू केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळं जनमानसात संभ्रमाचं वातावरणही पाहायला मिळत आहे. पण, तूर्तास पुण्यात कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात आलेली ‘पुण्यात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊन’ अशा आशयाचा एका चॅनेलचा जुन्या बातमीचा व्हिडीओ पुन्हा एकदा कोणीतरी व्हायरल केला आहे.

सध्या तरी पुण्यात प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक तसेच ग्रुपचे नाव ( स्क्रीन शॉट सह) पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. कृपया, कोणीही अफवा पसरवू नये, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कळविले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.