काबुल : अफगाणिस्तानमधील पंजशीरमधील युद्ध संपुष्टात आल्याची घोषणा तालिबानने केली. पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. आम्ही हा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. याच विजयासोबत अफगाणिस्तानमधील संपूर्ण युद्धविराम लागल्याची घोषणा तालिबानने जारी केलेल्या पत्रकात केली. यावेळी तालिबानने इशारा देखील दिला आहे. “जर कोणी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याला पंजशीरप्रमाणे हाताळले जाईल”, असा इशारा तालिबान्यांनी दिला आहे.
तालिबानने इशारा दिला आहे की जो कोणी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याला पंजशीर प्रतिरोधक दलांप्रमाणे हाताळले जाईल. पंजशीर हा तालिबानविरोधी शक्तींचा शेवटचा बालेकिल्ला होता. तालिबानने दावा केला आहे की त्यांनी पंजशीरवर ताबा मिळवला आहे. परंतु आघाड्यांनी हा दावा फेटाळून लावला.
तालिबानने म्हटले आहे की, “आम्ही हा प्रश्न शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला. काबूलमधून पळून गेलेल्या लोकांना अजूनही वाटते की ते तालिबानशी लढू शकतात. आता आशा आहे की आम्हाला कायमची शांतता मिळेल. जर कोणी आता समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही पंजशीरला दिले तसे चोख उत्तर देऊ,”
दरम्यान, तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिद्दीनने एक पत्रक देखील जारी केलं आहे. “आमच्या शत्रूच्या ताब्यात असणारा पंजशीर प्रांत आम्ही पूर्णपणे ताब्यात घेतलाय. देवाने आणि देशाने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर देशातील प्रत्येक प्रांताला सुरक्षा पुरवण्यासाठी आम्ही करत असणाऱ्या या प्रय़त्नांना यश आलं आहे,” असे पत्रकात म्हटले आहे.