धूम्रपानादी गोष्टींचा शरीरावर होणारा वाईट परिणाम होतो. असे असतानाही त्याची सवय असणाऱ्यांची संख्या कमी नाही. आज शासनाकडून धूम्रपानाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या जाहिराती सर्वत्र दाखवल्या जातात. सिगारेट, तंबाखूच्या पाकिटावर सावधानतेचा वैधानिक इशारा दिलेला असतो. हे सगळे पाहून किंवा माहिती असतानाही लोक याकडे दुर्लक्ष करून धूम्रपानाच्या आहारी जातात.
धूम्रपान/ तंबाखू सेवन सोडण्यासाठी उपाय
-तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन सोडण्याचा दृढनिश्चय करावा.
-व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन त्यांचा योग्य सल्ला घ्यावा.
-तंबाखूजन्य पदार्थ नजरेसमोर राहतील असे ठेवू नका.
-तंबाखूजन्य पदार्थ अडगळीच्या ठिकाणी ठेवा म्हणजे ते सहजासहजी उपलब्ध होणार नाहीत.
-तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याची इच्छा झाल्यास स्वत:ला दुसऱ्या कामात व्यस्त ठेवा.
-किंवा इतर घातक नसलेले उदा.बडीशेप, वेलची, लवंग आदी पदार्थांचे सेवन करा.
-तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या सहकारी/ मित्र यांच्यापासून स्वत:ला दूर ठेवा.
-निर्व्यसनी लोकांची/ मित्रांची संगत वाढवा.
-तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची इच्छा झाल्यास त्यापासून होणाऱ्या आजारांचा, आर्थिक नुकसानीचा व मुलाबाळांचा विचार करा.
-कर्करोगाचा रुग्णाच्या भयावह अवस्थेचा विचार करा.
-आपल्या जवळच्या व्यक्तीची मदत घ्या.