रेमडेसिविर वाद ! अखेर ‘त्या’ आयुक्तांची बदली

मुंबई – दोन दिवसांपूर्वी उदभवलेल्या रेमडेसिविरच्या वादातून अखेर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हान यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून संबंधित अधिकारी मुजोरच होते असे म्हटले आहे. तर काळे यांच्या बदली विरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. काळेंची बदली करुन ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठल्याचा घणाघात भातखळकरांनी केला आहे.

महाराष्ट्र अडचणीत असताना स्वत:च्या परीने महाराष्ट्राला मदत केली नाही. उलट संभ्रमाचे वातावरण निर्माण केले. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही मी कारवाईबाबत सांगितलं आणि त्यांनी होकार दिला. मुजोर अधिकाऱ्यांना बाजूला करणं योग्यच असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. ही धमकी नाही. इतर अधिकाऱ्यांनी काय समजायचं ते समजा. का कारवाई झाली, कशामुळे झाली याबाबत मी बोलणार नाही, असंही आव्हाडांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.