कोरोना विषाणूंवर ‘रेमडेसिवीर’ औषध प्रभावी- अँथोनी फॉउसी

नवी दिल्ली :  कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत २ लाख २७ हजारांपेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जगभरातील ८० संस्थाच्या माध्यमातून कोरोना विषाणूंवर संशोधन सुरु आहे. मात्र, अमेरिकेत कोरोना विषाणूंवर प्रभावी औषध सापडल्याचा दावा संशोधकाने केला आहे.

अमेरिकन संशोधकांनी कोरोना विषाणूंवर ‘रेमडेसिवीर’ औषध प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार असणाऱ्या डॉक्टर अँथोनी फॉउसी यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाग्रस्त रुग्णांवर रेमडेसिवीर वापल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्याचे ते म्हणाले.

रेमडेसिवीर औषध देण्यात आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत ३० टक्के वेगाने मात केल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. रेमडेसिवीर देण्यात आलेले रुग्ण ११ दिवसांमध्ये तर इतर औषध देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये १५ दिवसांत कोरोनमुक्त झाल्याचे निरिक्षक नोंदवण्यात आलं आहे. औषधामुळे कोरोनावर मात करता येईल असं फॉउसी यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितल्याचे वृत्त पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.