माणसाच्या जीवाचा बाजार! रेमडेसीविरसाठी पिंपरी पोलिसांनी ग्राहक बनून महिला नर्सला लावला फोन; ऑडिओ क्लिप ऐकून बसेल धक्का

पिंपरी – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. लोक डॉक्टर रुपी देवाकडे जीवदान मागत आहेत. मात्र काही डॉक्टर, नर्स यांच्याकडून जनतेची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.  कोरोना काळात जीव वाचवण्यासाठी महत्वाचे वाटत असलेल्या रेमडेसीविर इंजेक्शन चा काळाबाजार सुरू आहे. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना पिंपरी चिंचवड पोलिसांनी स्वतः ग्राहक बनून समोर आणली आहे.

नेहरूनगर येथील आयुष हॉस्पिटलमधील नर्स ज्योती कोकणे-लगड हा काळाबाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिच्याशी पोलिसांनी संवाद साधला तेंव्हा तिने अनेक धक्कादायक माहिती उघड केली.

40 हजारांना एक रेमडिसिव्हीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या ज्योति सह राहुल बोहाळ, विजय शिरसाठला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ठोकल्या बेड्या आहेत.

येथे क्लिक करून ऐका ऑडिओ क्लिप –

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.