समुद्र किनाऱ्यावर सापडले 1700 वर्ष जुन्या इमारतीचे अवशेष

डर्बेंट – रशियातील डर्बेंट शहराजवळील कॅस्पियन समुद्राजवळ तब्बल 1700 वर्षांपूर्वीची इमारत सापडली असून संशोधक सध्या म्यूऑन रेडिओग्राफीच्या सहाय्याने या भूमिगत इमारतीचे स्कॅनिंग करत आहेत. ही इमारत मध्ययुगीन नार्यन-कला किल्ल्‌याच्या जवळ ईशान्येकडे आहे. हा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीत असल्याने तिथे उत्खनन करण्यात अडचणी येत आहेत.

ही इमारत स्थानिक भागात आढळणाऱ्या चुनखडीच्या दगडांची आहे. तिची प्रतिकृती बनवण्यासाठी सध्या म्यूऑन रेडिओग्राफीचा उपयोग केला जात आहे. तिची उंची 36 फूट, लांबी 50 फूट आणि रुंदी 44 फूट आहे. काही संशोधकांच्या मते हे झोराष्ट्रीयन (पारशी) अग्निमंदिर असावे. तर, काही संशोधकांना वाटते की हे सर्वात जुने चर्च असावे. ही इमारत जर चर्चची आहे हे सिद्ध झाले तर ते जगातील सर्वात जुने चर्च ठरू शकते.या इमारतीची रचना आयताकृती असल्याने हे पाणी साठवण्याचे ठिकाण असू शकते असेही संशोधकांचे मत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)