रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी खोपोली येथुन ताब्यात

नारायणगाव :  रेमडेसिवर इंजेक्शन चा काळाबाजार करणारी टोळी नारायणगाव पोलिसांनी खोपोली येथून ताब्यात घेतली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, रोहन शेखर गणेशकर हा रेमडेसिवीर इंजक्शन 1) स्वप्निल सुनिल देशमुुख (गुरव) (वय 19 वर्ष) 2) आकाश प्रकाश कलवार (वय 25 वर्ष) 3) विनोद जगदीशप्रसाद जाकोटीया (वय 40 वर्षे) सर्व राहणार खोपोली (ता. खालापुर जि. रायगड) यांचे कडुन घेवून कोरोना रुग्णांची गरज ओळखून प्रत्येकी 25000 रुपये किंमतीला विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार नारायणगाव पोलिसांनी गुरुवारी (दि.29) वरील सर्वांना खोपोली येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याची त्यांनी नारायणगाव पोलिसांना कबुली दिली आहे. पोलिसांनी त्या चौघांना अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कस्टडी दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण विवेक पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पो.ना. धनंजय पालवे, पो.काॅ. शैलेश वाघमारे, पो.काॅ. सचिन कोबल यांचे पथकाने केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पृथ्वीराज ताटे प्रभारी अधिकारी नारायणगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.