देशासाठी पंधरवडा संवेदनशील!

संरक्षण, अर्थ आणि रामजन्मभूमीचा निकाल येणार

नवी दिल्ली : रामजन्मभूमी खटल्याचा अंतीम निकाल या पंधरवड्यात लागणार असल्याने हा काळ देशासाठी सर्वार्थाने संवेदनशील असणार आहे. अशी नाजूक वेळ दीर्घ काळानंतर देशावर आली आहे.

देशाचे सरन्यायधिश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यापुर्वी ते अनेक महत्त्वाच्या खटल्यांचे निकाल देणार आहेत. त्यात रामजन्मभूमी निकालाचा समावेश आहे. 1885पासून न्यायलयात खितपत पडलेला रामजन्मभूमीचा हा खटला अखेर निकाली निघणार आहे. हा निकाल एकमुखी किंवा खंडपीठात 4:1 किंवा 3:2 अशा विभाजनाने असू शकतो. पण देशाच्या धार्मिक आणि राजकीय वातावरणावर गेले शतकभर प्रभाव टाकणाऱ्या या प्रकरणावर अखेर पडदा पडू शकतो.

महत्वपूर्ण अयोध्या प्रकरणाबरोबरच न्या. गोगोई हे साबरीमला आणि राफेल प्रकरणावरही निकाल जाहीर करतील. या कामाच्या व्यस्ततेमुळे न्या. गोगोई यांनी त्यांचा अधिकृत सरकारी दौरा रद्द केला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. सरन्यायधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ अयोध्या प्रकरणाचा निकाल देणार आहे. न्या. गोगोई यांनी अपरिहार्य कारणांमुळे परदेश दौरा रद्द केला. आपला पदभार सोडण्यापुर्वी ते दक्षिण अमेरिकी देश, मध्य पूर्वेतील देश आणि अन्य काही देशांना नियोजित भेटी देणार होते.

आयोध्या खटल्याची सरन्यायधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुठे दीर्घकाळ सुनावणी झाली. त्यानंतर त्यावरील निकाल राखून ठेवला. हा निकाल 17 नोव्हेंबर म्हणजे न्या. गोगोई निवृत्त होण्याच्या दिवशी जाहीर होणे अपेक्षित आहे.

अयोध्या प्रकरणाशिवाय राहूल गांधी यांच्यावर भाजपाच्या खासदार मीनाक्षी लैखी यांनी दाखल केलेला न्यायलयीन अवमानाच्या खटल्याचा समावेश आहे. त्याशिवाय वित्त कायदा 2017 च्या संविधानिक वैधतेबाबतच्या खटल्यावर निर्णय दिला जाणार आहे. हा कायदा संसदेत मनी बिल म्हणून आणण्यात आला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.