मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला दिलासा

निलंबन आदेशाला कॅटकडून स्थगिती
बंगळूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला केंद्रीय प्रशासकीय लवादाने (कॅट) दिलासा दिला आहे. त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाला कॅटने स्थगिती दिली आहे.

मोहम्मद मोहसीन असे दिलासा मिळालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) कर्नाटक केडरचे अधिकारी आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून मोहसीन यांची ओडिशात नियुक्ती करण्यात आली. त्यांनी काही दिवसांपूर्वी ओडिशाच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर असणाऱ्या मोदींच्या हेलिकॉप्टरची संबलपूरमध्ये तपासणी केली. त्यावरून निवडणूक आयोगाने मोहसीन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्याशिवाय, त्यांना कर्नाटकला परत पाठवण्यात आले. पंतप्रधान या नात्याने मोदींना एसपीजीची सुरक्षा आहे. एसपीजीची सुरक्षा असणाऱ्या व्यक्तींची तपासणी करता येत नाही. त्यामुळे मोहसीन यांनी निकषांचे उल्लंघन केल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने त्यांना निलंबित केले. निरीक्षक म्हणून मोहसीन यांनी एसपीजीची सुरक्षा असणाऱ्या व्यक्तींबाबतचे निकष माहीत असणे आवश्‍यक होते. त्यांनी कर्तव्यात कसूर केली, असा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.