तूर, हरभरा अनुदानातील वंचित शेतकऱ्यांना दिलासा; बॅंक खाते दुरुस्तीसाठी ‘ही’ शेवटची संधी

नगर: तूर व हरभरा अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून, बॅंक खाते दुरूस्तीसाठी 7 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या लाभार्थी शेतकऱ्यांनी नोंदणीकृत बॅक खाते चालू करुन व आधार नंबर बॅंकेशी मॅपीग करुन आधारकार्ड बॅंक खाती लिंक करायचे आहे. तसेच बॅंकेचे प्रमाणपत्र खरेदी केंद्र व जिल्हा मार्केटींग कार्यालय येथे जमा करायचे आहे.

शासनाकडून अंगीकृत शिखर सहकारी संस्थेमार्फत शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केले जाते. सन 2017-18 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत तूर व हरभारा खरेदीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करण्यात आली होती. नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांपैकी ऑनलाईन पोर्टलद्वारे ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आलेले नाहीत.

अशा खरेदीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे भावांतर योजनेप्रमाणे नोंदणी केलेल्या बॅंक खाते क्रमांकावर अनुदान जमा करण्यात आले. तर काही शेतकऱ्यांनी चुकीचे बॅंक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, बंद खात्याचे क्रमांक, बॅंक खाते आधार लिंक आणि आधार मॅपींग केलेले नाहीत अशा शेतकऱ्यांचे अनुदानाची रक्‍कम शासनास परत गेलेली होती. लाभार्थ्यांनी हे खाते दुरूस्ती करण्यासाठी शासनाकडून 7 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.