सोलापूर : सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्याने त्यांची खासदारकी धोक्यात आली होती. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी न्यायालयाला सांगितले कि, जात पडताळणी समितीसमोर आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. म्हणून कोर्टाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे.
स्वामी यांनी मागील वर्षी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर मतदार संघातून त्यांचा विजय विजय झाला होता.
स्वामी यांच्या विरुद्ध माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी जातपडताळणी समितीकडे तक्रार केली होती. जयसिद्धेश्वर स्वामी याच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिगायत असा जीतीचा उल्लेख असून, त्यांनी निवडणूकीच्या वेळी बेडा जंगम जातीचे बनावट प्रमाणपत्र दाखल केले होते, अशी तक्रार प्रमोद गायकवाड यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती.