रेमडेसिविरच्या किमती कमी केल्याने दिलासा; वाचा नवीन किमती

इंजेक्शनवरील छापील किमत जवळपास 30 ते 70 टक्के घटवली

पुणे – करोना रुग्णांना काही प्रमाणात दिलासादायक ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या किमती कमी करण्याचा दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने शनिवारी घेतला. त्यामुळे इंजेक्शनचा काळा बाजार आणि रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट थांबण्याची चिन्हे आहेत.

 

 

रेमडेसिविरच्या किमतीबाबत देशभरातून ओरड सुरू आहे. त्यातही मागणी वाढल्याने हे इंजेक्शन काळ्या बाजारात 35 हजार रुपयांपर्यंत विकले जाते. या प्रकारांबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर संबंधित उत्पादक कंपन्या आणि केंद्र सरकारने शहाणपणा दाखवत या इंजेक्शनवरील छापील किंमत अखेर कमी केली आहे.

 

याबाबतचे आदेश रसायने आणि खते विभागाच्या औषधनिर्माण विभागाचे सदस्य सचिव विनोद कोतवाल यांनी शनिवारी जारी केला आहे. हे आदेश सर्व राज्यांच्या अन्न व औषध प्रशासनालाही पाठवण्यात आले आहेत.

 

  • उत्पादक कंपनी – इंजेक्शनचे नाव – जुनी किंमत – नवी किंमत
  • कॅडिला हेल्थकेअर- रेडमॅक- 2,800 -899 Rs.
  • सिंजेन-बायोकॉन – रेमविन – 3,950- 2,450 Rs.
  • रेड्डीज लॅब – रेडिक्स- 5,400 – 2,700 Rs.
  • सिप्ला – सेप्रेमी- 4,000- 3,000 Rs.
  • मायलन फार्मा.- डेसरिम- 4,800- 3,400 Rs.
  • ज्युबिलिअंट जेनेरिक्स -ज्युबी-आर – 4,700- 3,400 Rs.
  • हेटेरो हेल्थकेअर – कोविफॉर – 5,400 – 3,490 Rs.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.