पाकिस्तानच्या एफ-16 विमानाचे अवशेष सापडले

नवी दिल्ली – भारतीय सैन्यावर बुधवारी (27 फेब्रुवारी) झालेल्या अयशस्वी हल्ल्याच्या प्रयत्नानंतर पाकिस्तान सातत्याने खोटेच बोलत आहे. पाकिस्तानच्या आणखी एका खोट्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे. भारतीय हद्दीत घुसलेले जे पाकिस्तानी विमान एफ-16 भारताने पाडले होते, त्याचे अवशेष पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये सापडले आहेत. जे भारतीय वायूदलातील “मिग-21’ने पाडले होते.

जम्मू-काश्‍मीरमधील नौशेरा येथे घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ 16 हे लढाऊ विमान पाडण्यात भारताच्या हवाई दलाला बुधवारी यश आले होते. हे विमान पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये जाऊन पडले होते. या विमानाचे अवशेष सापडले असून यासंबंधीचा फोटो समोर आला आहे. या फोटोत पाकिस्तानी अधिकारी विमान पडलेल्या ठिकाणी पाहणी करतानाही दिसत आहे. पाकिस्तानच्या 7 नॉर्थन लाइट इंफन्ट्रीचे कमांडिंग अधिकारी आहेत.

एका वृत्तसंस्थेने एफ-16 विमानाच्या इंजिनाचा एका फाईल फोटोही शेअर केला आहे, जे ढिगाऱ्यात दिसत असलेल्या फोटोशी मिळतंजुळतं आहे. फोटोमध्ये दिसणारे अवशेष एफ-16 विमानाच्या इंजिनाचा भाग आहे. मात्र यानंतर सोशल मीडियावर हाच फोटो भारताच्या मिग विमानाचा असल्याचे सांगत व्हायरल झाला होता. मात्र भारतीय हवाई दलाने हा फोटो पाकिस्तानच्या एफ16 विमानाचा असल्याची खातरजमा केली आहे.

दरम्यान, पाकिस्तानने अद्याप ही बाब स्वीकारली नाही. इतकंच नाही तर एफ-16 विमानाचा वापरच झाला नव्हता, असा दावाही पाकिस्तान सैन्याच्या प्रवक्‍त्यांनी केला होता. पण पाकिस्तान ज्या अवशेषांना भारताचे विमान असल्याचा दावा करत आहे, ते जीईएफ-110 इंजिन आहे, जे एफ-16 विमानात लावले जाते. तसेच भारत सरकारनेही पाकिस्तानी विमान पाडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.