नवी दिल्ली – रिलायन्स जिओ या कंपनीने गेल्या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून 20 अब्ज डॉलर भांडवल उभारले आहे. आता या समूहातील रिलायन्स रिटेल परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवल जमा करण्याठी हालचाली करीत आहे.
माध्यमातील बातम्यांनुसार अमेरिकेतील प्रायव्हेट इक्विटी कंपनी सिल्वर लेक पार्टनर्स रिलायन्स रिटेलमधील 1 अब्ज डॉलरचे म्हणजे 8 हजार कोटी रुपयांचे भांडवल विकत घेणार आहे. या कंपनीने रिलायन्स जिओ मधील 10 हजार कोटी रुपयांचे भागभांडवल विकत घेतले होते. रिलायन्स रिटेल साधारणपणे 57 अब्ज डॉलर डॉलरची कंपनी समजले जाते. रिलायन्स रिटेल 5.7 अब्ज डॉलरचे भांडवल जमा करण्याच प्रयत्न करीत आहे.
परदेशातील ज्या गुंतवणूकदारांनी रिलायन्स जिओतील भागभांडवल विकत घेतले आहे, त्यांना रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणुकीची संधी देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांचा हवाला देऊन माध्यमांनी सांगितले. रिलायन्स इंडस्ट्रीजमधील सर्व कंपन्या कर्जमुक्त करण्याचे रिलायन्स उद्योग समूहाने ठरविले आहे.