‘ती’ सेवा पुन्हा ‘फ्री’ करत रिलायन्स जीओकडून ग्राहकांना नववर्षाचं ‘मोठं’ गिफ्ट

मुंबई – आपल्या भन्नाट ऑफर्समुळे भारतातील टेलिकॉम इंडस्ट्रीत अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना नवं वर्षाचं एक मोठं गिफ्ट दिलंय. यानुसार जिओचे ग्राहक आता १ जानेवारीपासून पुन्हा एकदा देशातील सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग करू शकणार आहेत.

जिओने आज याबाबतचा निर्णय घेताना IUC म्हणजेच interconnect usage charges पूर्णपणे बंद केलेत. आज घोषित करण्यात आलेल्या या निर्णयानुसार आता जीओने 1 जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य केली आहे.

काय आहेत सध्याचे चार्जेस?

अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी सध्या जिओकडून  IUC चार्ज आकारला जातो. यासाठी जिओ दर मिनिटाला 14 पैसे आकारत होती, नंतर त्यात 7 पैसे कपात करण्यात  आली होती. पण आता हा चार्ज पूर्णपणे हटवण्यात येणार असल्याने 1 जानेवारीपासून विनाशुल्क कॉलिंग करता येणार आहे.


जिओने शब्द पाळला  

सप्टेंबर २०१९ मध्ये IUC चार्ज आकारायला सुरूवात केल्यानंतर जिओने ज्यावेळी ट्राय आययुसी चार्ज संपवेल तेव्हा आम्हीही युजर्सकडून आययुसी चार्ज आकारणार नाही असं स्पष्ट केलं होतं. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) निर्देशानुसार, देशात १ जानेवारी २०२१ पासून Bill and Keep नियम लागू होणार आहे.

त्यामुळे IUC चार्ज संपणार आहे. त्यामुळे जिओने आपला शब्द पाळत आता ट्रायने १ जानेवारीपासून आययुसी चार्ज आकारणार नसल्याने ग्राहकांना पुन्हा एकदा विनामुल्य कॉलिंगची सेवा देऊ करणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.