मुंबई – बॉलिवुडमधील भाईजान अर्थात सलमान खानचे चाहते त्याच्या आगामी “दबंग-3′ चित्रपटाची अतुरतने वाट पाहत आहेत. पुढील वर्षी ईदनिमित्त प्रदर्शित होणार “इंशाअल्लाह’ची रिलीज डेट रद्द करण्यात आली असून “दबंग-3’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे बोलले जात होते. मात्र, आता “दबंग-3’ची डेट कन्फर्म झाली आहे.
Aa Rahe Hain! Chulbul Robinhood Pandey. Theek 100 din baad. Swagat Toh Karo Humara! #100DaystoDabangg3https://t.co/MVGLceqIez@arbaazSkhan @sonakshisinha @PDdancing @KicchaSudeep @nikhil_dwivedi @SKFilmsOfficial @kjr_studios @AChowksey @SureshProdns #GlobalCinemasLLP
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 11, 2019
याबाबत चित्रपटामधील सलमान खानने ट्विट केले आहे की, ‘‘दबंग 3’चं मोशन पोस्टर शेअर केलं. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 100 दिवसांनंतर येतोय, चुलबुल रॉबिनहुड पांडे, बरोबर 100 दिवसांत स्वागत तर करा माझं. #100DaysToDabangg3. या मोशन पोस्टमध्ये सलमान त्याच्या खास दबंग स्टाइलमध्ये चालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान, ‘स्वागत नहीं करोगे हमारा.’ असं बोलताना दिसत आहे.
तत्पूर्वी, चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली नसून तो निश्चितच केलेल्या तारखेला म्हणजे डिसेंबर-2019मध्येच प्रदर्शीत होणार आहे. तसेच पुन्हा एकदा डायरेक्टर प्रभुदेवासोबत काम करताना खूपच मज्जा आली, असेही तिने सांगितले. “दबंग’ सीरीजमध्ये काम करणे म्हणजे घरी परत आल्यासारखे वाटते. हा माझा पहिला चित्रपट असल्याने मी या चित्रपटात काम करण्याच्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. दरम्यान, हे वर्ष सोनाक्षीसाठी फलयादी ठरत असून तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. “कलंग’ आणि “खानदानी शफाखाना’नंतर तिचा नुकताच “मिशन मंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळत असल्याने सोनाक्षी सध्या फार्मात असून तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.