बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या निवडक चित्रपटांमुळे चाहत्यांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक चित्रपटात अक्षय कुमार एका वेगळ्या भूमिकेत दिसत असतो. दरम्यान, आता पुन्हा एकदा अक्षय कुमार आपल्या आगामी “मिशन मंगल” या चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटचा ऑफिशल टीझर रिलीज करण्यात आल्या असून, बॉलिवूड मधील अनेक दिग्ग्ज चेहरे यामध्ये दिसून येत आहे.
“मिशन मंगल” चित्रपटात अक्षय कुमारबरोबर अभिनेता विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी आणि अभिनेता शरमन जोशी देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार असून, 15 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे