‘सांड कि आंख’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज 

नवी दिल्ली – आगमी चित्रपट ‘सांड कि आंख’चे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. ‘शरीर म्हातारे होऊ शकते मन नाही’, अशी कॅप्शन या पोस्टरला देण्यात आली आहे. या चित्रपटाचे पोस्टर तापसी आणि भूमीने ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे.

‘सांड कि आंख’ हा चित्रपट जगातील सर्वात वृद्ध महिला शार्पशुटर चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर आधारित आहे. चंद्रो आणि प्रकाशी यांची जोडी इंडियाज गॉट टॅलेंटच्या मंचावरही शार्पशूटिंगचे कौशल्य दाखविले आहे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावर अनेक मेडल त्यांनी जिंकले आहेत. चंद्रो यांचे वय ८७ वर्षे तर प्रकाशी यांचे ८२ वर्षे आहे.उत्तरप्रदेशच्या जोहरी गावातील चंद्रो आणि प्रकाशी यांनी वयाच्या ५० व्या वर्षांपासून शार्पशूटिंग करण्यास सुरुवात केली होती.

‘सांड कि आंख’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केलंय. अनुराग कश्यप, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि निधी परमार हे निर्माते आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.