मुंबई- संजूबाबा अर्थात बॉलिवूडचा अभिनेता ‘संजय दत्त’ आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तने आपल्या आगामी ‘बाबा’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले होते. मात्र, आता या चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. डिझर मध्ये अभिनेता ‘दीपक डोब्रियाल’ मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील देखील काही चेहेरे प्रेक्षकांना दिसणार आहेत. नंदिता धुरी-पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी हे यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राज गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Presenting #BabaTeaser, our first Marathi film production – https://t.co/GW3GaP0g9q#BabaOn2Aug @maanayata_dutt @RAjRGupta2 #ManishSingh @SanjayDuttsProd @deepakdobriyal #NanditaPatkar #AryanMeghji @RjAbhee @spruhavarad @ashoksubhedar @subhedar_aarti @Sandy_Bhargava pic.twitter.com/iLLPAMVf9r
— Sanjay Dutt (@duttsanjay) July 8, 2019