‘पीएम मोदी’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज 

बहुचर्चित ‘पीएम मोदी’ चित्रपटातचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तीन मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये लहानपणापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंत मोदींचा प्रवास दाखविण्यात आला आहे.

पीएम मोदी या चित्रपट विवेक ओबेरॉय मध्यवर्ती भूमिकेत आहे. विवेक ओबेरॉयसह बामन इराणी, मनोज जोशी, प्रशांत नारायण, राजेंद्र गुप्ता,जरीना वहाब आणि अंजन श्रीवास्तव मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ओमंग कुमार बी. यांनी सांभाळली असून विवेक ओबरॉय आणि संदीप सिंग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. पीएम मोदी चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.