जामखेड : बीड कडून जामखेड कडे कत्तलखान्यात घेऊन जाणार्या बेकायदेशीर वाहनास पाठलाग करून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या मदतीने साकत परिसरात पकडुन पाच जनावरांची सुटका केली. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस काँस्टेबल बाजीराव सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अक्रम गफार कुरेशी रा. खर्डारोड, जामखेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकत परिसरात साकेश्वर गो शाळेचे बांधकाम सुरू असल्याने श्री शिवप्रतिष्ठानचे पांडुराजे भोसले व ईतर धारकरी जामखेड मधील शिवभक्त साकतला चालले होते. याच दरम्यान एक पिकअप ५ गोवंश जनावरे यात दोन गायी, एक म्हैस व दोन रेडे असे घेऊन जात आसताना दिसले. भोसले यांनी पोलीसांना या बाबत कल्पना दिली. तो पर्यंत टॅम्पो एम एच १४ डी एम ३८३६ हा फरार झाला होता. मात्र पोलीसांनी टॉम्पो चा पाठलाग करत या वहानास साकत ( कोल्हेवाडी) शिवारात पोलीस कॉन्स्टेबल बापूसाहेब गव्हाणे, गणेश साने, शशिकांत म्हस्के, बाजीराव सानप यांच्या पथकाने पकडला. व त्या मधिल पाच जणांनावरांची सुटका केली.
सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लाॅकडाउन असताना व जनावरांच्या बाजारांना बंदी घातली असतानाही या जनावरांच्या वाहतुकीस परवानगी मिळतेच कशी? जागोजागी चेकपोस्ट असतानादेखील कत्तलखान्यात जनावरांची वाहतुक कशी होते असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.