चीनच्या ताब्यातील कॅनडाच्या नागरिकांची सुटका

टोरांटो  – चीनने ताब्यात घेतलेल्या कॅनडाच्या दोन नागरिकांची चीनकडून सुटका करण्यात आली आहे, असे आज कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी जाहीर केले. अमेरिकेने बजावलेल्या वॉरंटच्या आधारे कॅनडाच्या पोलिसांनी चीनच्या तंत्रज्ञानविषयक कंपनीच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्याला 2018 मध्ये अटक केली.

त्यानंतर लगेचच मायकेल स्पॅव्हर आणि मायकेल कोव्हिग या दोन नागरिकांना चीनने हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. या दोघांनी प्रथमपासूनच आपण निरपराध असल्याचे म्हटले होते.

कॅनडा आणि अमेरिकेत जालेल्या तडजोडीनुसार हुयावेई केंपनीचे एक्‍झिक्‍युटिव्ह मेंग वेंगदाऊ यांची कॅनडातून सुटका झाली आणि ते कॅनडातून चीनला रवाना झाले. त्यानंतर लगेचच कॅनडाच्या दोन्ही नागरिकांची चीनमधून सुटका झाली असल्याचे ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.