मुंबई – बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. पागलपंती चित्रपटानंतर आता तो लवकरच एका ॲक्शन मूव्हीमधून दिसून येणार आहे. अटॅक असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. पुढील वर्षी 14 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.
#IndependenceDay weekend yet again for John Abraham… #Attack to release on 14 Aug 2020… Stars John Abraham, Jacqueline Fernandez and Rakul Preet… Directed by Lakshya Raj Anand… PEN Studios [Jayantilal Gada], JA Entertainment [John Abraham] and Ajay Kapoor presentation. pic.twitter.com/5qkDfwSSdm
— taran adarsh (@taran_adarsh) November 30, 2019
जॉनसोबत या चित्रपटात जॅकलिन फर्नांडीस आणि रकुल प्रीत सिंह यांच्याही प्रमुृख भूमिका आहेत. लक्ष्मी राज आनंद यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुऴे लवकरच प्रेक्षकांना जॉनचे स्टंटस पहायला मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी 14 ऑगस्ट 2020 पर्यंत थांबाव लागेल.