मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या फॅन्सना आता आणखीन एक मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. “वांडा व्हिजन’ आणि “द फाल्कन ऍन्ड द विंटर सोल्जर’ नंतर मार्व्हलने आता आपली तिसरी सीरिज आणायचे ठरवले आहे.
मार्व्हल स्टुडिओची वेबसीरिज “लोकी’ भारतात इंग्लिश आणि हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलुगूमध्येही रिलीज होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी मार्व्हल स्टुडिओने या वर्षापासून ते 2023 पर्यंत रिलीज होणाऱ्या सिनेमांच्या रिलीज डेट जाहीर केल्या आहेत.
त्यातच बहुप्रतीक्षेत “लोकी’ या सीरिजची रिलीज डेटदेखील जाहीर केली गेली आहे. “लोकी’मध्ये टॉम हिडल्टन लीड रोलमध्ये असेल, तर ओवन विल्सन, गुगु बाथा रॉ, सोफिया डी मार्टिनो, वूनमी मोसाकू आणि रिचर्ड डे ग्रांट हे कलाकार असणार आहेत. ही वेब सीरिज भारतात डिज्नी प्लस हॉटस्टारवर 9 जूनपासून दिसणार आहे.