अध्यक्षीय निवडणुकीत रशियाची मदत घेतल्याच्या आरोपातून ट्रम्प यांना दिलासा

थेट पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट ; न्याय विभागाच्या तपासातील निष्कर्ष

वॉशिंग्टन: अमेरिकेत सन 2016 साली झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचे उघड झाले असले तरी स्वता ट्रम्प यांनी रशियाची मदत घेतल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध झाले नाहींत त्यामुळे या प्रकरणात त्यांचा काही हात नाही असा निष्कर्ष अमेरिकेच्या न्याय विभागाने चौकशीअंती काढला आहे त्यामुळे ट्रम्प यांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाचे स्पेशल कौन्सेल रॉबर्ट म्युएलर यांनी या प्रकरणाचा तपास करून अहवाल दिला आहे. त्यात ट्रम्प यांनी रशियाची मदत घेऊन त्यांच्या मदतीने काही कट केला काय किंवा त्यांनी त्यांच्याशी संधान साधले होते काय या प्रश्‍नाच्या अनुषंगाने तपास करण्यात आला पण तसा कोणताही पुरावा आढळला नाही असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. म्युएलर यांच्या अहवालाची माहिती ऍटर्नी जनरल विल्यम बर्र यांनी कॉंग्रेसला पत्र पाठवून दिली आहे. तपास अधिकाऱ्याने म्हटले आहे की या प्रकरणात ट्रम्प यांना थेट निर्दोष ठरवता येत नाही पण त्यांच्यावर जे काही आरोप होते त्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाला नाही.

त्यामुळे या विषयी गेले दोन वर्षे ट्रम्प यांच्यावर असलेले बालंट आता टळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. चौकशीत ट्रम्प यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नसल्याचे दिसून आल्याने हे प्रकरणच आता दप्तरी दाखल करून ठेवले जाईल असे सांगण्यात येते. मे 2017 पासून ही चौकशी सुरू होती. त्यात तपास अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेतील तीन डझन लोकांची चौकशी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)