24 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, अंगावरती मारहाणीचे व्रण; पतीसह सासरचे फरार

बुलढाणा – राज्यात महिला अत्याचारांच्या रोज घटना समोर येताना दिसून येत आहेत. याशिवाय महिलांच्या अत्याचारांमध्ये कौटुंबीक अत्याचाराचे प्रमाण सुद्धा मोठा प्रमाणात होताना दिसून येत आहे. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून समोर आली आहे. एक विवाहिता राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत मिळाली आहे.

या विविहीतेला रुग्णालयात दाखल कले मात्र उपचारसुरु असताना तिचा मृत्यू झाला असून तिच्या शरिरावर मारहाणीचे व्रण दिसून आले आहे. त्यामुळे ही हत्या असल्याचा आरोप मृत महिलेल्या नातेवाईकांनी केला आहे.

श्रध्दा गजानन वैतकार, वय 24 असे या विवाहितेचे नाव असून ती खामगाव शहरात गोपाळनगर मध्ये रहावयास होती. खामगाव पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी महिलेच्या विवाहितेचे वडिल भानुदास मोतीराम काळींगे यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर महिलेचा पती व सासरची मंडळी फरार झाली आहे. पोलिसांनी गजानन रामदास वैतकार (पती), रामदास वैतकार (सासरा), उषा बैतकार(सासू ),दीपा प्रभाकर पातोंड(नणंद) व प्रभाकर पातोंड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विवाहितेस सासरच्याकडून कार घेण्यासाठी माहेरून 2 लाख घेऊन येण्याचा तगादा लावण्यात आला होता. यासाठी तिचा सतत पती व सासरच्याकडून शारिरीक व मानसिक छळ केला जात होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.