वृत्तपत्र संस्था आणि विक्रेते बांधव यांचे नाते

आमदार मुक्‍ता टिळक : आप्पा बळवंत चौकातील वृत्तपत्र विक्रेत्यांना धान्य संच वाटप

पुणे – वृत्तपत्र संस्था आणि विक्रेते यांचे नाते व्यवहारापलीकडचे आहे. एका कुटुंबाप्रमाणे एकमेकांची मदत त्यांनी नेहमीच केलेली आहे. करोना संक्रमाणामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. अडचणीच्या काळात दिलासा मिळावा, या हेतूने आप्पा बळवंत चौकातील वृत्तपत्र विक्रेते यांना धान्याच्या संचाचे वाटप करण्यात येत आहे, असे कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी सोमवारी सांगितले.

“केसरी’चे विश्‍वस्त आणि संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते धान्य संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी “केसरी’चे वितरण व्यवस्थापक शैलेश टिळक, वृत्तपत्र विक्रेते संघाचे अध्यक्ष विजय पारगे, कार्यकारी अध्यक्ष दत्ता पिसे, सचिव अरुण नवघणे, संदीप शिंदे, रोहित गणेशकर, चंदन कोऱ्हाळकर, विश्‍वास शेवाळे, गिरीश नगरकर, अतुल पारगे हे संघटनेचे पदाधिकारी आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

“करोना संक्रमणामुळे गेल्या काही महिन्यांचा काळ आपल्या सर्वांसाठीच अडचणीचा राहिला आहे. या काळात वाचकांना अधिक चांगली आणि खरी माहिती मिळावी, यासाठी वृत्तपत्रे सुरू ठेवण्यात आली,’ असे डॉ. दीपक टिळक म्हणाले. दरम्यान, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.