बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री परिणीति चोप्रा सध्या सायना नेहवालच्या बायॉपिकच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात सायनाची भूमिका साकारण्यासाठी ती खूपच मेहनत घेत आहे. या चित्रपटासाठी जेवढी तयारी करण्यात येईल, तेवढी कमीच आहे, असे परिणीती एका मुलाखतीत म्हणाली.
दरम्यान, या बायॉपिकमध्ये श्रद्धा कपूर काम करणार होती. यासाठी श्रद्धानेही बॅडमिंटन कोर्टवर कठीण सराव केला होता. पण बिझी शेड्यूलमुळे श्रद्धाने या चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर परिणीति ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी ती खूपच उत्सुक आहे.
याशिवाय अस्टिटंट डायरेस्टर चरित देसाईच्या रिलेशनशिपबाबत विचारले असता परिणीति म्हणाली, मी कधीही कोणत्याही गोष्टीला न दिला नाही आणि होकारही दर्शविला नाही.
माझे कुटुंबिय आणि माझे मित्र सत्य काय आहे, हे जातात. त्यामुळे तेच माझयासाठी महत्त्वाचे आहे. पण प्रसार माध्यमांना मी यावर काहीतरी बोलावे, असे वाटते. परंतु हे माझे वैयक्तिक आयुष्य आहे. त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीला होकार देईन आणि कोणत्याही गोष्टीला नकार देईन, असे परिणीतिने सांगितले.
दरम्यान, सायनाच्या बायॉपिकचे शुटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय परिणीति-सिद्धार्थ ही जोडी “जबरिया-जोडी’मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.