रेखा जरे खून प्रकरण: खंडणी गुन्ह्यात डॉ. दहिफळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

 

नगर – दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात येथील क्षयरोग अधिकारी डॉ. भागवत दहिफळे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यासह डॉ. दहिफळे यांच्या विरोधात मंगल भुजबळ हजारे यांनी 29 डिसेंबरला खंडणी मागितल्याची फिर्याद दिली होती.

त्यावरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. जिल्हा परिषदेत कंत्राटी स्वरूपात वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक म्हणून नोकरी करत असताना बाळ बोठे याने माहितीच्या अधिकारात अर्ज देवून वैयक्तीक माहिती मागविली होती. त्यात नोकरी लपवून महापालिकेची निवडणूक लढविली, अशी बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली होती.

दरम्यान, तत्पूर्वी बोठे याने डॉ. भागवत दहिफळे माझे चांगले मित्र आहेत, असे सांगून कार्यालयातील सर्व गोपनीय माहिती ते मला पुरवितात. त्यामुळे तुमच्या कार्यालयातील बरीच माहिती माझ्याकडे प्राप्त झाली आहे. त्यात तुम्ही सरकारची परवानगी न घेता निवडणूक लढविली आहे, हा महत्त्वाचा मुद्दा माझ्या हाती लागला आहे. त्यातून तुम्हाला सहीसलामत बाहेर पडायचे असेल, तर 10 लाख रुपयांची तडजोड करा, असे म्हणत त्याने मला खंडणी मागितल्याचा दावा दावा मंगल हजारे यांनी केलेला आहे. त्यात दहिफळे यांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.