रेखा जरे खून प्रकरण : बोठेच्या स्टॅंडिंग वॉरंटच्या प्रती सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पाठविणार

बोठेच्या तपासाला आता गती येईल : पोलीस उपाधीक्षक

नगर -यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याविरोधात स्टॅंडिंग वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्याच्या प्रती आता सर्वच पोलीस ठाण्यांत पाठविण्याची प्रक्रिया पोलीस दलाने सुरू केली आहे. 

दरम्यान, पारनेर येथील न्यायालयाने काल बाळ बोठे याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या स्टॅंडिंग वॉरंटचा अर्ज मंजूर केल्याने आता त्याच्या तपासासाठी गती येईल, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी दिली. तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी बोठे याच्या स्टॅंडिंग वॉरंटसाठी पारनेर न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

काल (दि. 6) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी स्टॅंडिंग वॉरंट अर्ज मंजूर केला. आता बोठेच्या तपासासाठी अटक वॉरंट काढून आरोपीस ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली. त्यातही आरोपी मिळून न आल्यास पुढील कारवाई करून सर्वच पोलीस ठाण्यात पान 2 वर…

पोलिसांनी जामीन मिळू देऊ नये : लगड
रेखा जरे हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. पोलिसांनी बोठे यास खंडपीठातून जामीन मिळू नये, यासाठी प्रभावी युक्तिवाद करायला हवा, अशी मागणी ऍड. सुरेश लगड यांनी केली आहे. त्या संदर्भात लगड यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.