कोची- शबरीमलाच्या भगवान अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रकाझोतात आलेली आणि त्यामुळेच वादग्रस्त ठरलेली कार्यकर्ता रेहना फातिमा आता आणखी एक नावा वादओढवून घेतला आहे. रेहानाने तिच्या अर्धनग्न शरिरावर पेंटींग करून घेतल्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तिने तिच्या अल्पवयीन मुलांकडून स्वत:च्या अनावृत्त
शरिरावर हे पेंटींग करून घेतले व त्याचे व्हिडीओ व्हायरल केले. झाल्या प्रकारामुळेखळबळ उडाली असून पोलिसांनी त्याची दखल घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माहिती तठत्रज्ञशन कायदा आणि बाल हक्क कायद्यान्वये तिच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे नेत एवी अरूण प्रकाश यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता.
रेहानाने स्वत: बॉडी अँड पालिटीक्स या नावाने हा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर तो अत्यंत वेगाने व्हायरल झाला. त्याची दहा मिनिटांतच दखल घेत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
फातिमा यापूर्वी 2018 मध्ये प्रसिध्दीच्या झोतात आली होती. मनाई हुकुम मोडून शबरीमलाच्या भगवान अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न तिने केला होता. यामुळे भगवान अय्यप्पाच्या भाविकांमध्ये
संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी तिला अटक करण्यात आली होती. केरळमधील नैतिक पोलिसींगच्या विरोधातही 2014 मध्ये तिने आवाज उठविला होता. त्याचाही एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल
झाला होता व त्यावरूनही बराच गदारोळ माजला होता. दरम्यान, मिंहलांबाबत समजात जे बुरसटलेले विचार आहेत, त्याला विरोध करण्याचा हा आपला प्रयत्न असल्याचे रेहाना फातिमाचे म्हणणे आहे.